कुंजीरवाडी, दि.१४ मे २०२० : कारगिल कडून हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी या गावात कोविंड – १९ च्या बचाव कार्याला मदत म्हणून गोरगरीब लोकांना जेमिनी कुकिंग ऑइलचा पुरवठा केला. तसेच प्रत्येक कुटुंबास एक किलो खाद्य तेल व एक किलो याचे वाटप करण्यात आले.
यावेळी कांदे व कारगीलचे भारतातील तेल व्यवसायाचे व्यवस्थापकीय संचालक पियूष पटनायक म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीचा जगभरातील प्रत्येक उद्योग क्षेत्र व समुदायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. आमच्या व्यवसायाचे स्वरूप पाहता आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव आहे. म्हणून आम्ही अत्यावश्यक ठिकाणी आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी अथक मेहनत घेत आहोत आम्ही कार्यरत असलेल्या ठिकाणी आमचे कर्मचारी व समुदायांना सॅनिटायझेशन किटचे वाटप करण्याची देखील काळजी घेत आहोत.
आम्ही स्थानिक अधिकारी यांच्या मदतीने एनजीओ भागीदाराच्या माध्यमातून आणि प्रत्येक ठिकाणी लोकांच्या पोषणासाठी अन्न सामग्री व आहार सुविधा देत आहोत. कारगिल इंडियाचे कर्मचारी देखील स्वेच्छेने या थोर कार्याला पाठिंबा देत आहेत. अशी माहिती “न्यूज अनकट” शी बोलताना पटनायक यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे