चाळीस विद्यार्थ्यांना केले जीवनावश्यक किटचे वाटप

औरंगाबाद, दि.१६ मे २०२०: कोरोना महामारीमुळे परिस्थिती अतिशय बिकट होत चालली आहे. शहरांत कोरोना रुग्णांची संख्या ८०० च्या जवळपास पोहचली आहे. गरजवंत लोकांना मदत करणारे हात कमी झाले आहे. मात्र,अशा काळात पाण्यात काम करणाऱ्या जलदूतची सामाजिक संस्थेची मदत चालूच आहे.

पहाडसिंगपुरा आणि विद्यापीठ परिसरातील ४० स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज १५ दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूची किट राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य व जलदूतचे अध्यक्ष किशोर शितोळे यांच्या वतीने उद्योजक निशांत वाघ यांच्या हस्ते देण्यात आल्यात.

आजवर जलदूत सदस्यांनी अनेक विद्यार्थ्यांना गावाकडे जाण्यासाठी मदत केली आहे. पहाडसिंगपुरा भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रूममध्ये जाऊन त्याची पाहणी करून रूमभाडे , डब्यांची व्यवस्था तसेच आर्थिक अडचण या विविध अडचणी जाणून घेतल्या.

आम्ही तुमच्या सोबत आहे , असे सांगून शितोळे यांनी विद्यार्थ्यांना धीर दिला. आपला कोणी शेजारी बांधव उपाशी राहणार नाही, यासाठी त्याची व दानशूरांची भेट घडवून आणण्याचे ईश्वरी कार्य करूया.

टाळेबंदी सुरू झाल्यापासून आतापर्यत १५० विद्यार्थ्यांना जलदूत सामाजिक संस्थेच्या वतीने मदतीचा हात देऊन उपासमारीची वेळ येऊन दिली नाही. शहरात जलदूतचे ६०० सदस्य असून, आपापल्या परीने निधी संकलन करून गरजू विद्यार्थी व कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य देत आहेत.

या प्रसंगी जलदूतचे सदस्य विकास थाले , वासुदेव मुळीक, गणेश गिरे, अमोल धरे हे उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा