मंचरमध्ये बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांना सक्तीने क्वारंटाईन

मंचर, दि.१६ मे २०२०: खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील मंचर ग्रामपंचायतीने पुणे, मुंबई या व इतर भागातून येणाऱ्या नागरिकांना सक्तीने क्वारंटाईन करण्यासाठी कडक धोरण अवलंबले आहे.

मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयात विलिगीकरण कक्ष तयार केला असून सर्व गरजेच्या वस्तू देऊन बेड तयार केले आहेत.
कोरोनावर मात करण्यासाठी मंचर शहरात पहिल्या दिवसापासून कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.

कोरोना आता दाराजवळ येऊ लागल्याने विनापरवानगी बाहेर गावावरुन येणाऱ्यांचे आता सक्तीने क्वारंटाईन करुन विलिगीकरण केले जाणार आहे. नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याचे सरपंच दत्ता गांजळे यांनी सांगितले.

क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या नागरिकांना मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयात विलिगीकरण कक्ष तयार करुन एका व्यक्तीला अत्यावश्यक असणाऱ्या सर्व सुविधा आतापासूनच उपलब्ध केल्या आहेत.

कोरोनाचा समूहसंसर्ग झाला तर मोठ्या संख्येने नागरिकांना क्वारंटाईन करण्याची वेळ येईल, त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून मंचर ग्रामपंचायतीने तात्काळ हे पाऊल उचलले आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी – साईदिप ढोबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा