औरंगाबाद शहरात रॅपिड ऍक्शन फोर्सचे पथसंचलन

औरंगाबाद, दि.१७ मे २०२०: औरंगाबाद शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा कालावधीत शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि लोकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी शहराच्या विविध भागात पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या आदेशावरून रॅपिड ऍक्शन फोर्स तर्फे पथ संचलन करण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू असतानाही काही नागरिक विनाकारण घराबाहेर फिरतात. त्यामुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

या स्थितीवर नियंत्रण करण्यासाठी शहरातील पुंडलिकनगर, चेलीपुरा , जीन्सी, चंपाचौक, शहागंज राजाबाजार, गुलमंडी, सिटी चौक, परीसरात (RAF) रँपीड अँक्शन फोर्सचे पथसंचलन करण्यात आले.

यावेळी रँपीड अँक्शन फोर्स व पोलिस अधिकारी, कर्मचारी  मोठया संख्येने सहभागी झाले होते.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा