नवी दिल्ली, दि. १९ मे २०२०: केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास राज्य मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी ईशान्येकडची राज्ये आणि जम्मू काश्मिरला कोविड विषयक लष्कराच्या वैद्यकीय सहाय्याबद्दल प्रशंसा केली आहे. महामारीच्या सुरवातीलाच पावले उचलत निदान आणि उपचार सुविधांना जोड दिल्याबद्दल लष्करी वैद्यकीय सेवांची त्यांनी प्रशंसा केली आहे.
ईशान्ये संदर्भात जनरल बनर्जी यांनी जितेंद्र सिंह यांना सद्य परिस्थिती आणि अद्ययावत घडामोडी याबाबत माहिती दिली. अरुणाचल प्रदेश मध्ये तेंगा इथल्या लष्करी रुग्णालयात कोविड रुग्णासाठी ८० खाटा आणि २ आयसीयु खाटा तर लिकाबाली इथल्या लष्करी रुग्णालयात कोविड साठी ८२ खाटा आणि २ आयसीयु खाटा ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आसाम मधे जोरहाट इथल्या लष्करी वैद्यकीय सेवा इथे ११० आणि १० आयसीयु खाटा तर मेघालयात शिलाँग इथे लष्करी वैद्यकीय सेवा इथे २४७ कोविड खाटा आणि ४ आयसीयु खाटा ठेवण्यात आल्या आहेत.
लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अनुप बनर्जी यांच्याकडून जितेंद्र सिंह यांनी माहिती घेतली. उधमपूर इथल्या लष्करी रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी २०० खाटा आणि गंभीर रुग्णांसाठी ६ आयसीयु खाटा ठेवल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. श्रीनगर इथल्या लष्करी रुग्णालयात १२४ खाटा आणि राजौरी इथल्या लष्करी रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी ८२ खाटा ठेवून केंद्र शासित प्रदेशाच्या आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सुविधांना जोड दिल्याची त्यांनी दखल घेतली.
कोविड महामारीच्या सुरवातीलाच तत्पर सहाय्य पुरवल्याबद्दल प्रशंसा करत यामुळे रोग आटोक्यात ठेवण्यासाठी मदत झाल्याचे ते म्हणाले. लष्करी वैद्यकीय सेवेने विलगीकरण सुविधा आणि क्वारंटाईन कॅम्प उभारल्याचा उल्लेख त्यांनी केला.
परिस्थिती पाहुन आणि पुरवठादारांकडून उपलब्ध साहित्यानुसार अशा रुग्णालयांची संख्या वाढवण्यात येत असल्याचे एएफएमएसच्या महासंचालकांनी सांगितले. परिस्थिती लक्षात घेऊन येत्या काळात खाटांची संख्या वाढवण्यात येईल असे त्यांनी मंत्र्यांना सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी