पुणे,दि.१९ मे २०२०: पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सोमवारी(दि.१८) रोजी स्वैब सेन्टर व प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली.
स्वैब सेंटर मधील नागरिकांची नोंदणी, स्वैब कक्ष, विलगिकरण कक्ष, प्रत्येक ठिकाणी नागरिकांकरिता करण्यात आलेली सुविधा व भोजन सुविधा याबाबतची माहिती घेतली. येथील सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
स्वैब सेंटर नंतर चुडामन तालीम, जुना मोटर स्टँड परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात करण्यात आलेला बंदिस्त भाग, अडथळे,पत्र्याने बंदिस्त केलेल्या भागाची पहाणी केली.
याप्रसंगी अविनाश बागवे, रफिक शेख, मनपा आयुक्त शेखर गायकवाड, साखर आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, उपआयुक्त माधव देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ बनकर, परिमंडळ वैद्यकीय अधिकारी डॉ,राजेश दिघे, डॉ,अब्दुल सलाम सुतार, सहाययक आरोग्यप्रमुख डॉ, वैशाली जाधव, उपायुक्त माधव जगताप आदींशी चर्चा केली.
या परिसरातील मंजुळाबाई चाळीत संशयित व बाधित रुग्ण आढळल्यामुळे या चाळीस त्यांनी भेट दिली. याप्रसंगी अरविंद शिंदे, मनपा आयुक्त शेखर गायकवाड, साखर आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अगरवाल यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
न्युज अन कट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर