उद्धव ठाकरेंनी मराठी चित्रपट व रंगभूमीवरील कलाकारांशी साधला संवाद

मुंबई, दि. २१ मे २०२०: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोरोनामुळे येणाऱ्या समस्यांच्या अनुषंगाने मराठी चित्रपट निर्माते, नाट्य व मालिका निर्माते, कलाकार यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी सर्वांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या प्रयत्नांत आमची साथ राहील याची ग्वाही दिली.

ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये दक्षता घेऊन व सर्व नियम पाळून मर्यादित स्वरूपात का होईना, चित्रीकरण सुरु करता येईल का याचा विचार करता येईल पण त्यासाठी कंटेनमेंट झोन्समध्ये चित्रीकरण स्थळे नाहीत ना, तसेच चित्रीकरण पथकातील लोकांची संख्या, त्यांचे राहण्याच्या -जेवण्याच्या गोष्टीदेखील पाहाव्या लागतील.

मनोरंजन क्षेत्र हे केवळ करमणूक करणारे नाही तर लोक त्यांचे अनुकरण करतात, त्यांच्यापासून शिकतात त्यामुळे या क्षेत्राचे महत्व आहे. नाट्य आणि चित्रपटगृहे ही सार्वजनिकरीत्या एकत्र येण्याची ठिकाणे असल्याने तिथे लगेच परवानगी देता येईल असे वाटत नाही असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणाऱ्या व्यक्तींमध्ये सुबोध भावे, आदेश बांदेकर, निखिल साने, नितीन वैद्य, अतुल परचुरे, अवधूत गुप्ते, मंगेश कुलकर्णी, रवी जाधव, विजू माने, राहुल देशपांडे, रत्नकांत जगताप, अजय भालवणकर, मुक्ता बर्वे, केदार शिंदे, सुकन्या मोने, पुष्कर श्रोत्री, हेमंत ढोमे, प्रशांत दामले, सुभाष नकाशे, प्रसाद महाडकर, शरद पोंक्षे असे कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरे पाहायला मिळाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा