लोणी काळभोर, दि.२१मे २०२० : कदमवाकवस्ती येथे आज(गुरुवारी) रोजी ग्रामपंचायत हद्दीतील पठारे वस्ती, परीसरात ६२ वर्षाची व्यक्ती कोरोनाबाधीत असल्याचे आढळुन आले आहे.
संबधित व्यक्तीस ससुन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असुन ससुनमध्येच संबंधित व्यक्तीच्या दोन मुलांच्या कोरोना टेस्ट करण्यात येणार आहेत. तर संबंधित कोरोनाबाधीत व्यक्तीच्या घरातील आनखी चार जणांना तातडीने कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्यात हलविण्यात येणार असल्याची माहिती, आरोग्य अधिकारी डॉ. डि. जे. जाधव यांनी “न्यूज अनकट” शी बोलताना सांगितले आहे.
कदमवाकवस्ती गावात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, गावातील काही व्यवसाय सुरू करण्यात आले होते. त्यामुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल होण्यागोदरच पठारे वस्ती, येथे कोरोना सदृश्य रुग्ण सापडल्याने लोणी काळभोर व कदमवाकवस्तीमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण आहे.पुन्हा कॅटेन्मेंट झोन जाहीर होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे