नॉन कोविड रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा मिळाव्यात: रुपाली चाकणकर

पुणे, दि. ६ सप्टेंबर २०२०: पुण्याच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली ताई चकाणकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. त्यावेळी नॉन कोविड-१९ रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा मिळाव्यात अशी मागणी केली.

राज्यातील बहुतांश रूग्णालये खासकरून खाजगी रूग्णालये कोणत्याही रूग्णाला कोविड-१९ टेस्ट रिपोर्ट असल्याशिवाय रुग्णालयात दाखल करून घेत नाहीत. याचा खुप मोठा फटका नॉन कोविड रूग्णांना बसत असल्याचे अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.

कृपया आरोग्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून नॉन कोविड रुग्णांना, खास करून गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना कोविड-१९ ची चाचणी रिपोर्ट्सची अनिवार्यतीची अट ठेवू नये. अगदीच आवश्यक असल्यास रुग्णालयांनी अंत्यत कमी कालावधीत होणारी कोविड-१९ ची अँटीजन टेस्ट करून तातडीने उपचार सुरु करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयानां निर्देश द्यावेत. नॉन कोविड रूग्णांना अत्यावश्यक सेवा मिळावी.

अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केली. आरोग्यमंत्री नक्कीच यावर योग्य निर्णय घेतील असा विश्वास यावेळी रूपाली ताईंनी व्यक्त केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा