डब्ल्यूडब्लूइ सुपरस्टार शॅड गॅस्पर्ड याचा समुद्रात बुडून मृत्यू

नवी दिल्ली, दि.२२ मे २०२० : जगातील फेमस खेळ डब्ल्यूडब्लूइ मधील सुपरस्टार शॅड गॅस्पर्ड याचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

आपल्या १० वर्षांच्या मुलासोबत कॅलिफोर्नियातील वेनिस समुद्र चौपाटीवर स्विमिंग करत असताना अचानक मोठी लाट आल्याने त्या लाटेत हे बाप लेक बुडू लागले. अशा परिस्थितीत शॅडने लाईफगार्ड रक्षकांना मुलाला शोधण्याची विनंती केली,पण यात शॅड मात्र बुडाला. प्रशासनाकडून त्याला शोधण्याचे काम सुरू होते.अखेर आज दुपारच्या सुमारास लॉस एंजलिस येथे त्याचा मृतदेह सापडला आहे. शॅड गॅस्पर्ड ३९ वर्षांचा होता. त्याच्या मृत्यूच्या बातमीला पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला आहे.

याबाबत पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की, ‘लॉस एंजलिस याठिकाणी आम्हाला एका अफ्रिकन-अमेरिकन पुरूषाचा मृतदेह सापडला असून त्याची उंची सहा फुट आणि २४० एवढं वजन असेल एवढा एक व्यक्ती सापडला आहे.

रविवारी( दि.१७) रोजी आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार हे शव शॅड गॅस्पर्डचे असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. आणि ते शव त्याचेच निघाले. त्याच्या अचानक जाण्याने डब्लू डब्लू इ या क्रिडा विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. या अपघातात शॅडच्या मुलाला वाचवण्यात जीव रक्षकांना यश आले आहे. असून तो सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे.गेल्या तीन दिवसांपासून त्याला शोधण्यासाठी पथक प्रयत्न करत होते. त्याचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला ते ठिकाण समुद्र किनाऱ्यापासून जवळपास ४६मीटर लांब होते.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा