आंबेगाव, दि. २२ मे २०२०: तालुक्यातील शिणोली या गावात कोरोनाचा रुग्ण सापडला आसून कोरोना रूग्णांची संख्या दोन झाली आहे. यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित रूग्ण हा दि.१५ रोजी मुंबईवरून पत्नी व मुलासह आपल्या शिणोली गावी आला होता. गावी आल्यानंतर स्थानिक आरोग्य प्रशासनाने त्यांना होम कॉरंटाईन केले होते. त्यानंतर सदर व्यक्तीला खोकला व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला याबाबत यांनी आरोग्य विभागाला कळवले असता त्या व्यक्तीला पुणे येथील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवसानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव आल्याने त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या घटनेनंतर शिणोली गाव पूर्णपणे बंद करण्यात आले असून स्थानिक प्रशासनाने सर्वांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. मागील काही दिवसात मुंबई पुण्यावरून मोठ्या प्रमाणात गावाकडे आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाने ग्रामीण भागात शिरकाव केला असल्याने प्रवास करूण आलेल्यांपैकी कोणालाही खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल व इतर काही आजार असेल तर त्यांनी ताबडतोब स्थानिक आरोग्य विभागाशी किंवा ग्रामीण रुग्णालयात माहिती द्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनीधी: साईदिप ढोबळे