इंदापूर तालुक्यातील माय-लेकराला कोरोनाची लागण

इंदापूर,दि.२२ मे २०२०: मुंबईवरून आलेल्या इंदापूर तालुक्यातील पोंदकुलवाडी येथे राहत असलेल्या एका कुटुंबातील मायलेकरांना कोरोनाची लागण झाल्याचे आज(शुक्रवार) स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इंदापूरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५ वर पोहचली आहे.

विशेष म्हणजे या मुंबईकरांच्या घशातील द्रवाच्या नमुने घेतल्यानंतर त्याचा रिपोर्ट आल्यानंतरही ही माय लेकरे घरीच होती. इंदापूर तालुक्यातील कोरोनाचे रुग्ण वाढण्यास मुंबईकरांनी हातभार लावलेला आहे. इंदापूरात सध्या वाढत असलेले रुग्ण हे मुंबईवरून आलेल्या लोकांमुळे वाढत आहेत. त्यात आज एकाची भर पडली.

बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत असलेल्या पोंदकुलवाडी येथील मूळ रहिवासी असलेले हे कुटुंब काही दिवसांपूर्वी मुंबईहून येथे आले आहे. तिघे जण या कुटुंबात आहेत. त्यापैकी एक मुलगा निगेटिव्ह आला असून ४२ वर्षीय आई व मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना सध्या कुठलीही लक्षणे दिसत नाहीत.परंतु आरोग्य खात्याने पुण्या-मुंबईहून आलेल्या सर्वांचीच काल (ता.२१) कोरोना चाचणी केली होती. या चाचणीचे अहवाल आता येऊ लागले आहेत. यामध्ये आज महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये या चाचणीत ही व्यक्ती कोरोना बाधित आढळली. त्यानंतर काही वेळाने याच कुटुंबातील मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एकाच दिवसात दोघे कोरोनाबाधित आढळल्याने इंदापूरकरांची चिंता वाढली आहे.

मात्र त्यातही लक्षणे असलेल्या कोरोनाग्रस्तानंतर आता कोणतीच लक्षणे नसलेल्या कोरोनाग्रस्तांमुळे इंदापूरकरांची चिंता वाढली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा