पंढरपूर, दि.२३ मे २०२०: पंढरपूरच्या श्री विठ्ठलरुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दशहाराच्या पहिल्या दिवसानिमित्त श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास आणि मंदिरात द्राक्षांची आकर्षक अशी आरास करण्यात आली.
यामुळे मंदिरात मनमोहक असे द्राक्षवेलीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले. लॉकडाऊन असला तरी पुजाऱ्यांकडून दररोज मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यात येते.
न्युज अनकट प्रतिनिधी: