सातारा, दि.२५ मे २०२०: सातारा जिल्ह्यामध्ये मुंबई पुण्याहून येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सातारा शहरामध्ये स्थानिक नागरिकांत भीतीच वातावरण पसरले आहे. त्यांची क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात यावी, तसेच रेल्वे रद्द झालेल्या परप्रांतीय नागरिकांची राहण्याची सोय करावी,अशी मागणी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे सातारा शहर भाजपने केली आहे.
भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्याबद्दल सातारा जिल्हा प्रशासनाकडे व्यवस्था नाही. तसेच ज्या ठिकाणी येणारे लोक ठेवले जातात त्याठिकाणची व्यवस्था ही स्थानिक असल्यामुळे त्याकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. आमची आपणास विनंती आहे की सातारा जिल्ह्यामधील कोरंन्टाइन सेंटरची यादी आपण सर्वसामान्य नागरिकांना समजावी म्हणून वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावी आणि त्या ठिकाणी योग्य त्या सुविधा देण्यास स्थानिक समितीला सूचना कराव्यात.
काही कारणामुळे या रेल्वे रद्द झाल्या आणि हे परप्रांतीय उघड्यावर पडले त्यांची जेवणाची वाताहात होत असल्यामुळे ते उपाशी राहिले त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे
सध्या सातारा जिल्ह्यात ६००० हून अधिक परप्रांतीय अडकून पडलेले आहेत. त्यांना घरी जाण्याची ओढ लागली आहे. आपणास विनंती आहे की, या परप्रांतीयांच्या रेल्वे लवकर सोडाव्यात आणि रेल्वेची व्यवस्था होईपर्यंत त्यांना राहण्याची तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेठवार, प्रवीण शहाणे, राहुल शिवनामे, विक्रम बोराटे यांनी केली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: