१०० तासापासून राज्यात लाईट आणि पाणी उपलब्ध नाही, जनतेत नाराजी

कोलकत्ता, दि. २६ मे २०२०: कोरोना संकटाच्या काळात आलेल्या सुपर चक्रीवादळ अम्फानने पश्चिम बंगालमध्ये कहर ओढवला आहे आणि वादळाच्या कित्येक दिवसानंतरही परिस्थिती सामान्य झाली नाही. राजधानी कोलकातामध्ये लोक वीज आणि पाण्यासाठी संघर्ष करण्यास भाग पडत रस्त्यावर उतरले आहेत. लोकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना अनेक ठिकाणी लाठीमार करावा लागला.

लोकांची तक्रार आहे की शहरात १०० तास वीज आणि पाण्याचा पुरवठा पूर्ववत झाला नाही. तथापि असा दावा करण्यात येत आहे की, ९५% भागामध्ये वीज आणि पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात आलेल्या सुपर चक्रीवादळामुळे राज्यात बर्‍याच प्रमाणात विनाश झाला आहे. देशाच्या इतर भागांप्रमाणेच बंगाललाही कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच यात चक्रीवादळाचे नवीन संकट उभे राहिले होते. त्यामुळे राज्यात सर्वत्र नासधूस झाली होती.

अनेक ठिकाणी रोडवर झाडे उन्मळून पडली होती तर काही ठिकाणी लाईटचे खांब देखील कोसळले होते. सामान्य जनजीवन अद्याप विस्कळीत आहे. शंभर तास उलटून देखील राज्य सरकारने पाणी आणि विजेची समस्या सोडवलेली नाही त्यामुळे लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा