वुहान, दि. २९ मे २०२०: जगात कोरोनाचे संकट पसरवणारा देश म्हणून चीन सर्वत्र चर्चेत आहे. वुहान शहरातील जनावरांच्या बाजारपेठेतून हा विषाणू बाहेर आल्याचे बोलले जात आहे. चीन मध्ये जनावरांचे कच्चे मास खाणे नेहमीची गोष्ट आहे. विशेषतः हा विषाणू पसरवण्यासाठी वटवाघळाचे मांस जबाबदार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या महामरी नंतर जगभरात चर्चा सुरू झाल्यानंतर चीनने आपले हे बॅट मार्केट बंद केले होते. परंतु आता हे मार्केट पुन्हा उघडण्यात आले आहे.
या बाजारपेठेत सजीव जनावरांची विक्री करणाऱ्या लोकांनी आपली दुकाने परत सुरू केली आहेत. ही दुकाने सुरू करण्यात आली आहेत पण बाजारापासून थोड्या अंतरावर नवीन ठिकाणी. ज्या बाजारातून कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याचे म्हटले जात आहे त्यास आता हुआनान सीफूड होलसेल मार्केट असे नाव देण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हुआनान सीफूड घाऊक बाजारातून प्रथम झाला. यानंतर १ जानेवारी रोजी हा बाजार बंद होता. चीनमधील या बाजारांमध्ये अशा सर्व प्रकारच्या प्राण्यांचे मांस भेटू शकते जे माणूस खाऊ शकतो किंवा खाण्याची इच्छा ठेवू शकतो. वुहानच्या जनावरांच्या बाजारात जवळपास ११२ प्रकारच्या प्राण्यांचे आणि किटकांचे मांस किंवा अवयव मिळू शकतात. याशिवाय मृत प्राणी स्वतंत्रपणे विकले जातात.
आपल्याला येथे कोंबडा, डुक्कर, गाय, म्हशी, कोल्हा, कोआला, कुत्रा, मोर, रॉयल, कोकरे, बदके, ससा, शुतुरमुर्ग, उंदीर, हरीण, साप, कांगारू, मगर, विंचू, कासव, उंट, मगरी, गाढव यांसारख्या प्राण्यांचे मास विकण्यास सापडतील. फोटोमध्ये बेडकांनी भरलेली बॅग दिसत आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी ही बाजारपेठ इतकी गर्दीने व घाणीने भरली आहे की येथून चालणे अवघड आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी