नवी दिल्ली, दि.३०मे २०२०: देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात केंद्रीय गृहमंत्रालयांकडून याचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे.
या लॉकडाऊन ५ मध्ये अनेक नियम शिथील करण्यात आले आहे. प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळे , हॉटेल, रेस्टॉरंट सुरु होणार आहेत. या विविध नियमाचं पालन करून पुढील गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
त्यानुसार काही अटींवर कन्टेनमेंट झोनच्या बाहेर आठ जूननंतर धार्मिक स्थळे तसेच शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मेट्रो, चित्रपटगृहे व जीम मात्र बंदच राहणार आहेत. शाळा सुरू करण्याबाबत राज्यांशी जुलैमध्ये चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. लॉकडाऊन दरम्यान रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत देशभर संचारबंदी (कर्फ्यू) राहणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी