नांदेड जिल्ह्यात ‘एसएफआय’ चे आंदोलन

नांदेड, दि.२ जून २०२० : स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटीतर्फे देण्यात आलेल्या हाकेनुसार शिष्यवृत्तीचे तात्काळ वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (दि.१) रोजी शहरासह जिल्हाभरात सोशल डिस्टन्स पाळत आंदोलन करण्यात आले.

लॉकडाऊनमुळे यंदा शैक्षणिक वर्ष २०१९-२० हे लवकरच संपले आहे. आतापर्यंत नांदेडसह राज्यातील सर्वच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळणे अपेक्षित होते परंतु आजपर्यंत हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत.

त्यामुळे स्वाधारची रक्कम त्याचबरोबर बार्टी अंतर्गत मिळणाऱ्या फेलोशीपची रक्कम ३०८ विद्यार्थ्यांना तात्काळ अदा करण्यात याव्यात, या मागणीसाठी सोमवारी हे आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आले.

यावेळी राज्याध्यक्षा बालाजी कलेटवाड, जिल्हाध्यक्ष विजय लोहबंदे, विकास वाठोरे, मीना आरसे, विशाल भद्रे, शंकर बादावाड, रत्नदिप कांबळे, स्वप्नील बुक्तरे, प्रफुल्ल कौडकर व अमोल सोनकांबळे आदींची उपस्थिती होती.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा