टिक टॉक च्या प्रतिसादाने तयार करण्यात आलेला एक कथित भारतीय लघु व्हिडिओ ॲप मित्रों गुगल प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आला आहे. हे ॲप काही काळासाठी बरेच लोकप्रिय झाले होते, परंतु हे ॲप भारतातले आहे की नाही याची चर्चा अद्याप सुरू आहे.
जेव्हा ॲप निर्मात्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा या निर्मात्याने आपली ओळख सांगण्यास नकार दिला. मित्रों ॲप निर्मात्याने असे सांगितले की आगामी काळात आम्ही आमची ओळख सामायिक करू.
अहवालानुसार स्पॅम आणि किमान कार्यक्षमतेच्या धोरणाचे उल्लंघन केल्याबद्दल गुगलने गुगल प्ले स्टोअर वरून हे ॲप काढले आहे. गूगलच्या या धोरणात असे म्हटले आहे की काहीही बदल न करता किंवा काहीही न जोडता इतर अॅप्सची सामग्री अपलोड करणे हे धोरणांच्या विरोधात आहे.
एकंदरीत, गूगलचे हे धोरण म्हणते की कॉपी पेस्ट अॅप – म्हणजेच इतर ॲपशी परिपूर्ण जुळणारे अॅप्स् आणि त्यांच्या कोडमध्ये कोणताही बदल न झाल्यास कंपनी ते काढून टाकते. पण प्रश्न असा आहे की हा अॅप बर्याच दिवसांपासून गुगल प्ले स्टोअरवर आहे, मग कंपनीने हे पाऊल का उचलले नाही.
विशेष म्हणजे भारतामध्ये चीनविरोधी भावना निर्माण होत आहेत आणि याच अनुक्रमे लोक चिनी अॅप्स आणि उत्पादने न वापरण्याकडे लक्ष देत आहेत. मित्रों ॲप नवीन नाही, परंतू असा दावा केला जात आहे की ते भारताचे आहे. पण या दाव्यात किती सत्यता आहे हे सांगणे कठीण आहे.
अहवालानुसार, मित्रों ॲपचा स्त्रोत कोड पाकिस्तानी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीकडून खरेदी केला गेला आहे, ज्याचे नाव क्यूबॉक्स आहे. स्त्रोत कोड पैसे देऊन विकत घेतला गेला आहे, त्यामुळे विकसक तो आरामात वापरू शकतात.
तथापि, एका अहवालात पाकिस्तानी स्टार्टअपचे मुख्य कार्यकारी अधिकारी इरफान शेख यांनी म्हटले आहे की विकसक त्यांना आवडेल तसे ते वापरू शकतात, कारण सोर्स कोड आमच्याकडून पैसे देऊन विकत घेण्यात आला आहे. तथापि, त्याला आक्षेप आहे की त्याला भारतीय ॲप म्हणणे योग्य होणार नाही, कारण त्याचा स्त्रोत कोड पाकिस्तानी आहे.
सीएनबीसी टीव्ही -१८ च्या अहवालात असे म्हटले आहे की गुगलने आता मित्रों ॲपला लाल झेंडा दाखवून निलंबित केले आहे. गुगलने म्हटले आहे की, धोरणाचे उल्लंघन केल्याने हे ॲप काढून टाकण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत मित्रों ॲप ५० लाखाहून अधिक वेळा डाउनलोड झाले आहे. हे ॲप भारतीय असल्याचे म्हटले जात असल्याने ज्या लोकांना टिक टॉक बंद करून भारतीय ॲप वापरायचे आहे त्यांनी हे डाउनलोड केले आहे. सध्या मित्रों अॅपवरून या ताज्या घडामोडी बाबत कोणतेही विधान मिळालेले नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी