हवेलीतील कामगारांना घरी राहून काम करण्याचे आदेश

कदमवाकवस्ती,दि.३ जून २०२० : गावातील शासकीय व खासगी कंपनीत काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहा जुनपासून पुढील सात दिवस आपापली कामे एकतर घरी बसून, अथवा कामाच्या ठिकाणी राहूनच करावी लागणार आहेत असा आदेश काढण्यात आला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत ये-जा करण्यास बंदी घातली आहे.

हवेली तालुक्यात कदमवाकवस्ती, वाघोली, मांजरी बुद्रुक व नऱ्हे या चार मोठ्या ग्रामपंचायत हद्दीत मागील दोन महिन्यांच्या कालावधीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. येथील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबवायाच्या उपाययोजनांबाबत विचारविनिमय करण्यासाठी हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी दोन दिवसांपूर्वी या चार गावांतील आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती.

या बैठकीत उपस्थित असलेल्या बहुसंख्य अधिकाऱ्यांनी या चार गावात कोरोना वाढीस गावातील शासकीय व खासगी कर्मचाऱ्यांची पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रोजची ये-जा मोठ्या प्रमाणात करणीभूत असल्याची भीती व्यक्त केली होती. त्यामुळे बारवकर यांनी वरिल आदेश काढला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना बारवकर म्हणाले की, कदमवाकवस्ती, वाघोली, मांजरी बुद्रुक व नऱ्हे या चार गावात रहिवासी असलेले अनेक शासकीय व खासगी व्यवस्थापनातील अधिकारी व कर्मचारी आपापल्या कामासाठी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत रोजच ये-जा करतात. दुसरीकडे पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले अनेक शासकीय व खासगी व्यवस्थापनातील अधिकारी व कर्मचारी आपापल्या कामासाठी या चार गावात आपापल्या कामासाठी प्रवास करतात. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अथवा शहरातून ग्रामपंचायत हद्दीत ये – जा करणाऱ्यांकडून या चार ग्रामपंचायत हद्दीत पुन्हा कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची भिती आहे.

त्यामुळेच सहा जुनपासून तब्बल सात दिवस शनिवारी (दि. ६) पहाटे पाच वाजल्यापासून शुक्रवारी (दि.१२) या चार गावातून पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत अथवा पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून वरील चार गावात शासकीय असो वा खाजगी कर्मचारी अशा सर्वांनाच बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लघंन करण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे बारवकर यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा