ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, सूर्यकुमार यादव करणार नेतृत्व

पुणे, २१ नोव्हेंबर २०२३ : विश्वचषक २०२३ संपल्यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांची टी-२० मालिका २३ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेतील शेवटचा सामना ३ डिसेंबर रोजी होणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणाही केली आहे. सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून त्याचबरोबर ऋतुराज गायकवाडला संघाचा उपकर्णधारपद देण्यात आले आहे. तर श्रेयस अय्यर शेवटच्या दोन टी-२० सामन्यांसाठी उपकर्णधार म्हणून संघात सामील होईल. भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजल्यापासून खेळवले जातील.

•पहिला सामना- २३ नोव्हेंबर, गुरुवार, राजशेखर रेड्डी एसीए- व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम
•दुसरा सामना – २६ नोव्हेंबर, रविवार, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम
•तिसरा सामना २८ नोव्हेंबर, मंगळवार, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
•चौथा सामना- ०१ डिसेंबर, विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
•पाचवा सामना – ०३ डिसेंबर, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद

भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रशीद कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलियन संघ: मॅथ्यू वेड (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, टीम डेव्हिड, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अ बॉट, जोश इंग्लिस, तन्वीर संघा, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, स्पेन्सर जॉन्सन, अ डम झाम्पा.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा