आजपासून ‘या’ तालुक्यातील आठवडे बाजार सुरू

उरुळी कांचन, दि. ५ जून २०२०: गेल्या अडीच महिन्या पासून बंद असलेले गावपातळीवरील आठवडे बाजार आजपासून पुन्हा सुरु होणार आहेत. गावपातळीवर भरणारे आठवडे बाजार बंद करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका छोट्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. गेल्या ७५ दिवसापासून बंद असलेले गावपातळीवरील आठवडे बाजार आजपासून पुन्हा सुरु होणार आहेत. “मिशन बिगीन अगेन” या मोहीमे अंतर्गत जिल्हातील कंन्टेमेन्ट झोन प्रतिबंधीत क्षेत्र वगळता गाव पातळीवरील सर्व प्रकारचे आठवडे बाजार सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल राम राम यांनी गुरुवारी ता. ४ रात्री उशीरा दिले आहेत. यातून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी तेरा मार्च रोजी गावपातळीवर भरणारे सर्वच प्रकारचे आठवडे बाजार बेमुदत बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र “मिशन बिगीन अगेन” या मोहीमे अंतर्गत गावपातळीवरील आठवडे बाजार सुरु करण्यास परवानगी मिळाली असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी आठवडे बाजारात येणाऱ्यांनी सोशल डिस्टन्स ठेवणे मास्क वापरणे यासारख्या आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटी घातल्या आहेत. या अटींचे पालण न झाल्यास अटीचे उल्लघंन होणारे आठवडे बाजार तात्काळ बंद करण्यात येतील, असेही नवल किशोर राम यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

खेडेगावातील अनेक भाजीपाला उत्पादक शेतकरी शेतातील भाजीपाला आठवडे बाजारात स्वतः विक्री करुन उपजिवीका करतात. तर दुसरीकडे थेट शेतकऱ्याकडुन भाजीपाल्याची विक्री होत असल्याने, सर्वसामान्यांना भाजीपालाही स्वस्त मिळत होता. मात्र आठवडे बाजार बंद झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र राज्य सरकारच्या लॉकडाउन समाप्त करणे व निर्बंध कमी करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या “मिशन बिगीन अगेन” या मोहीमे अंतर्गत नवल किशोर राम यांनी खालील आदेश दिले आहे. आठवडे बाजारात खालील नियमांचे पालन न झाल्यास आठवडे बाजार तात्काळ बंद करण्याबरोबरच कारवाई करण्याचा इशारा नवल किशोर राम यांनी दिला आहे.

आठवडे बाजार सुरु करण्यासाठी अटी

• आठवडे बाजारात येणारे शेतकरी व्यापारी व ग्राहक यांनी मास्क वापरणे बंधनकारक

• आठवडे बाजारात तंबाखू, गुटखा, पाणखाण्यास व थुंकण्यास सक्त मनाई

• शेतकरी, विक्रेते व ग्राहक यांच्यात किमान सहा फुटांचे अंतर आवश्यक

• आठवडे बाजाराची जागा व बाजारातील दुकानांचे ग्रामपंचायतीकडुन निर्जुतुकीकरण आवश्यक.

• आठवडे बाजारात य़ेणारे व जाणारे अशा सर्वांचे थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक.

• आठवडे बाजारात बसणाऱ्या विक्रेत्यांच्या जागा सहा फुटाचे अंतर राखून असाव्यात.

• आठवडे बाजाराची वेळ, दिवस व पार्किंग याबाबत ग्रामंपंचायत व स्थानिक पोलिसांनी ठरवाव्यात

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा