इटलीत २६ वर्षानंतर दिसले “तलावातील गाव”

नवी दिल्ली, दि.६ जून २०२० : इटली एक ऐतिहासिक घटना समोर आली आहे. तब्बल २६ वर्षांनंतर एका तलावातून एक गाव बाहेर आल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वजण आश्चर्य व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे इटली सरकारने शक्यता व्यक्त केली आहे की , पुढच्या वर्षा पर्यंत हे गाव पाहण्यासाठी पर्यटक जाऊ शकतील .

हे गाव गेल्या ७३ वर्षांपासून तलावात बुडले होते. काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या गावात शापित आत्मा आणि भुते होती, म्हणून या गावाला तलावात बांधून त्यात बुडविण्यात आले होते. अशी माहिती आता समोर येऊ लागली आहे.

त्यानंतर आता सुमारे २६ वर्षांनंतर या तलावाचे पाणी पुन्हा कमी होत असल्याने हे तलावातील गाव दिसू लागले आहे.

फॅब्रीश डी केरेगजिन असे या गावचे नाव आहे. असे म्हटले जाते की, १३ व्या शतकात हे गाव याठिकाणी वसले होते. या गावातून लोहाची निर्मिती करण्यात येत होती. या ठिकाणी लोहार समाजातील नागरिक राहत होते.

इटली परिसरातील लूका प्रांतामधल्या टस्कनी शहरात हे तलावातील गाव आता दिसू लागले आहे. त्यामुळे २६ वर्षानंतर हे गाव पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. हे गाव नेहमीच ३४ दशलक्ष घनमीटर पाण्यात बुडलेले असते. १९४७ मध्ये या गावात धरण बांधले गेले होते.

इतिहासकारांच्या अभ्यासानुसार असे म्हटले जाते की, या गावात भूत दिसत होते म्हणून या गावाला बुडविण्यात आले होते. परंतू आता धरण बांधणारे या ठिकाणचे पाणी कमी करत असून हे गाव पुढील वर्षापर्यंत स्वच्छ करून बघण्यासाठी खुले करण्यात येईल.

१९४७ मध्ये जेव्हा जलविद्युत धरण बांधले गेले तेव्हा इथल्या रहिवाशांना जवळच्या “वागली डी सोटो” या गावी हलवण्यात आले होते. आता जेव्हा हे फॅब्रीश डी केरेगजिन गाव बाहेर येईल, तेव्हा लोकांना त्यात १३ व्या शतकातील इमारती दिसतील. ज्या इमारती दगडांनी बांधल्या गेल्या आहेत.

या गावात आजही चर्च, स्मशानभूमी आणि दगडी घरे दिसतात. वागली डी सोटोचे माजी नगराध्यक्ष म्हणाले की, पाणी कमी पडताच लोक ते पाहण्यासाठी येतील. जेव्हा तलाव रिक्त असतो तेव्हा लोक या गावात फिरण्यास येत असतात.

फॅब्रीश डी केरेगजिन हे गाव १९४७ पासून वागली तलावामध्ये बुडलेल्या अवस्थेत आहे. ७३ वर्ष पाण्यात असलेले हे गाव आतापर्यंत फक्त चार वेळा म्हणजेच १९५८, १९७४, १९८४ आणि १९९४ मध्ये दिसले आहे. आणि आता २०२० मध्ये दिसत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा