आयएनएस जलाश्व ७०० भारतीयांसह माले येथून तुतीकोरिनसाठी रवाना

9

नवी दिल्ली, दि. ६ जून २०२०: परदेशातून आपल्या नागरिकांना समुद्र मार्गे भारतात आणण्याच्या प्रयत्नांमध्ये योगदान देत ऑपरेशन समुद्र सेतू अंतर्गत तिसऱ्या मोहिमेसाठी भारतीय नौदलाचे जलाश्व हे जहाज ४ जून रोजी  मालदीव मधील माले येथे पोहचले होते ते ५ जून रोजी ७०० भारतीय नागरिकांना घेऊन काल सायंकाळी उशिरा भारतासाठी रवाना झाले. भारताकडे प्रस्थान करण्यापूर्वी मालदीव तटरक्षक दलाचे कमांडंट कर्नल मोहम्मद सलीम यांनी या जहाजाला भेट दिली.

या फेरीबरोबरच केंद्र सरकारच्या मिशन वंदे भारतच्या व्यापक मोहिमेंतर्गत जलाश्व मालदीव आणि श्रीलंका मधील सुमारे २७०० भारतीय नागरिकांना यशस्वीरित्या भारतीय किना-यावर परत आणेल. जहाजावर कोविड प्रोटोकॉलचे  कठोर पालन केले जाईल आणि ७ जून रोजी ते तूतीकोरिनला पोहोचणे अपेक्षित आहे.

सुखरूप सुटका केलेल्या लोकांना तामिळनाडूच्या तुतीकोरिन येथे उतरवण्यात येईल आणि राज्य प्रशासनाच्या देखरेखीखाली सोपविण्यात येईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी