पुणेकर हे त्यांच्या चोखंदळ खाण्यासाठी ओळखले जातात अशाच पुणेकरांसाठी हॉटेल खानदेश सदाशिव पेठेत आपली शाखा उघडत आहेत.
प्रत्येक संस्कृतीची आपापली वैशिष्ट्ये असतात तीच वैशिष्ट्ये खान पानामध्ये दिसून येतात. आपल्या देशात प्रत्येक राज्याचे आपले विशिष्ट अन्नपदार्थ आहेत व ते राज्य त्या विशिष्ट पदार्थांसाठी ओळखले जाते. त्याप्रमाणेच आपली महाराष्ट्रीयन संस्कृती जपत हॉटेल खानदेश तुमच्यासाठी चविष्ठ खाद्यपदार्थ घेऊन येत आहे. तीन क्विंटल म्हणजेच ३०० किलो वांग्याचे भरीत केवळ ४० ते ४५ मिनिटांमध्ये बनवण्याचा पराक्रम या हॉटेल ने केला आहे. विशेष म्हणजे केवळ २० जणांच्या टीमने ३०० किलो वांग्याचे भरीत बनवण्याचे साहज केले आहे आणि तेही चविष्ठ!
आश्चर्याची बाब म्हणजे या वांग्याच्या भरीताचा आस्वाद ८०० खवय्यांनी घेतला आहे. रवींद्र गरुड ( नाना ), पुष्पा गरुड (नानी) आणि निलेश चौधरी यांचा भरीत बनवण्यामध्ये विशेष सहभाग असतो त्याचबरोबर स्वतःच्या हाताने लोकांना जेवण वाढण्याचे कार्यही करतात. संदीप पाटील, आशिष देशपांडे, ऋषी गरुड, दिपाली पाटील, युती देशपांडे, प्रदीप देशमुख, संकेत देशमुख हे इतर शाखांमध्ये कार्यरत आहेत. हॉटेल खानदेश च्या पुण्यामध्ये तीन शाखा आहेत आणि त्यांची चौथी शाखा सदाशिव पेठे मध्ये लवकरच येत आहे.