कर्जत, दि. ७ जून २०२०: कर्जत तालुक्यातील चिचोली काळदात येथील महिला सरपंच वंदना धनराज उंबाळे वय ३२ वर्ष यांनी रात्रीच्या सुमारास गावात आलेल्या नवीन व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यास सांगितले. या रागातुन बाळासाहेब रामा वाघमारे व युवराज पांडूरंग आखाडे यांनी उंबाळे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सरपंच वंदना यांचा फिर्यादी वरून भादंवि कलम ३५४.३५३. अन्वे बाळासाहेब रामा वाघमारे व युवराज पांडूरंग आखाडे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला.असून या प्रकरणी बाळासाहेब रामा वाघमारे यांस पोलिसांनी अटक केली आहे.
या बाबतीत सविस्तर वृत्त असे की, कर्जत तालुक्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रांत अधिकारी यांनी सर्व ग्रामपंचायतीचे सरपंचांची गाव समिती स्थापन केली आहे. या मध्ये गावात जर कोणी नविन आले तर त्यांची माहिती प्रशासनाला द्यावी. त्यांना विलगीकरण कक्ष ठेवण्याच्या सक्त सुचना दिल्या आहेत.
आशाच पध्दतीने चिचोली काळदात येथे आखाडे यांचे नातेवाईक बाहेरून आल्याची माहिती सरपंच वंदना यांना मिळताच त्यांनी त्या आलेल्या नागरिकांना कर्जत मधील मिरजगाव येथे विलगीकरण कक्ष ठेवण्यात आले आहे. पाहुण्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले म्हणून आखाडे आणि वाघमारे यांना मनात राग होता. रात्री सरपंच वंदना उंबाळे या घरातील काम करून भांडी घासलेले पाणी बाहेर टाकण्यासाठी आले असता बाहेर उभे असलेल्या बाळासाहेब रामा वाघमारे व युवराज पांडूरंग आखाडे या दोघांनी त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करत मारहाण केली. या प्रकरणी सरपंच वंदना उंबाळे यांनी कर्जत पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल होऊन बाळासाहेब रामा वाघमारे यांस पोलिसांनी अटक केली आहे. परंतू महिला सरपंच वंदना उंबाळे मारहाण घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष