सोलापूर, दि.१२जून २०२०: जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दहिवली येथील युवकांनी सहकार्याच्या भावनेतून समाजामधे एक चांगला संदेश पोहचवला.याबाबत सविस्तर माहिती अशी की , राज्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे, त्या अनुषंगाने कै. विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगांव या संस्थेच्या माध्यमातून कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या कार्यस्थळावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये माढा तालुक्यातील दहिवली येथील १५ युवकांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली . आजपर्यंत रक्तदान शिबिरात १००० रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
या शिबिरात बाळासाहेब देशमुख(सर), प्रदिप देशमुख, प्रताप खोचरे, हर्ष जगताप, अमिर जहागीरदार, सलीम देशमुख, सुनिल कोरडकर, प्रदिप लांडगे, संजय सरवदे (चिटबाँय), आनंद घाडगे, राजेंद्र भोरे, पांडुरंग करळे, अमोल पाटील, समाधान लांडगे, कुलदीप शिंदे, वैभव सावंत, जोतिराम नलवडे आदींनी सहभाग घेतला.
यावेळी रक्तदाते प्रदिप देशमुख यांनी सांगितले की, दहिवलीतील १५ युवकांनी रक्तदान करून कोरोना संकटकाळी योगदान देण्याचा प्रयत्न केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी