अमेरिकेत आणखी एका कृष्णवर्णीयाची पोलिसांकडून हत्या

अटलांटा, दि. १४ जून २०२० : अमेरिकेत वर्णभेदांवरून गेल्या काही दिवसांपासून हिंसक प्रदर्शने चालू आहेत. अशी परिस्थिती असताना आज अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा एका कृष्णवर्णीय व्यक्तीची पोलिसांनी गोळी घालून हत्या केली आहे. जॉर्ज फ्लॉयड यांच्या हत्येनंतर आता पुन्हा एकदा एका कृष्णवर्णीयाला पोलिसांनी मारल्यानंतर आधीच भडकलेल्या या हिंसाचारामध्ये आणखीन भर पडणार आहे.

शनिवारी अटलांटा येथील मुख्य महामार्ग बंद करून आंदोलकांनी वेंडी येथील रेस्टॉरंटला आग लावली जिथे एका कृष्णवर्णीय व्यक्तीला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार पोलिसांपासून वाचण्यासाठी तो केवळ प्रयत्न करत होता हे प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला गोळी मारली.

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राष्ट्रव्यापी सुरू असलेल्या ह्या आंदोलनामध्ये आणखीन एक भर पडली आहे आता हे प्रकरण पुन्हा चिघळत चालले आहे. ही घटना झाल्यानंतर अटलांटा मधील वातावरण अधिक तापलेले होते. शुक्रवारी रात्री २७ वर्षीय राशर्ड ब्रुक्स यांच्या निधनाबद्दल पोलिस प्रमुख एरिका शिल्ड्सचा राजीनामा स्वीकारल्याचे महापौर केइशा लान्स बॉटम्स् यांनी सांगितले.

स्थानिक वृत्तवाहिन्यांवरील व्हिडिओमध्ये असे दिसते आहे की पोलिस अधिकाऱ्यांची टीम आग विझविण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये पोहोचली तोपर्यंत आंदोलनकर्त्यांनी स्टेडियम पूर्णपणे जाळून टाकले होते. त्याचवेळी इतर विरोधकांनी महामार्ग क्रमांक -७५ वर मोर्चा काढून तेथील रहदारी पूर्णपणे बंद केली होती.

एका पत्रकार परिषदेत महापौर बॉटम्स् म्हणाले की, “मला विश्वास बसत नाही की पोलिसांनी त्या व्यक्तीवर अशी बलपूर्वक कारवाई केली. अशा प्रकारची कारवाई ही न्याय्य नाही” या प्रकरणाशी निगडीत अधिकाऱ्यांची नावे अद्याप सरकारने घोषित केलेले नाही. तथापि हे दोन्ही अधिकारी गौरवर्णीय असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रूकस एका अल्पवयीन मुलीचे वडील होते, ते शनिवारी आपला वाढदिवस साजरा करत होते आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच पोलिसांच्या गोळीने त्यांचा जीव घेतला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा