पाकिस्तान मधील भारतीय उच्चायोगातील दोन अधिकारी बेपत्ता

इस्लामाबाद, दि. १५ जून २०२० : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दोन भारतीय अधिकारी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानात भारतीय उच्चायोगाचे दोन अधिकारी गेल्या २ तासांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. हे प्रकरण पाकिस्तानमधील जबाबदार अधिकाऱ्यांसमोर उभे करण्यात आले आहे.

असे सांगितले जात आहे की, सीआईएसएफ चे दोन वाहन चालक कामानिमित्त बाहेर पडले होते परंतू त्यांच्या निश्चित ठाण्यापर्यंत ते पोहचलचे नाहीत. त्यांचे कुठेतरी अपहरण झाले असावे अशी भीती व्यक्त केली जात आहे. चालकाचा शोध घेण्यात येत आहे. तसेच, बेपत्ता झाल्याची माहिती पाकिस्तान सरकारला देण्यात आली आहे.

यापूर्वीही अशी बातमी आली होती की इस्लामाबाद मधील भारतीय डिप्लोमॅटला धमकावण्यात आले होते. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) च्या माध्यमातून इस्लामाबादमध्ये तैनात शीर्ष भारतीय डिप्लोमॅट गौरव अहलुवालिया यांना त्रास देण्याचे प्रकरण समोर आले होते. गौरव अहलुवालिया यांना धमकावण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. त्याचवेळी गौरव अहलुवालिया यांचा दुचाकीवरून पाठलाग करण्यात आला होता.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने पाकिस्तान मधील दोन संशयित अधिकाऱ्यांना पाकिस्तान मध्ये जाण्याचे निर्देश दिले होते. पाकिस्तानचे हे दोन अधिकारी भारतातील गुप्त माहिती पाकिस्तान पर्यंत पोहोचत होते. तसेच पाकिस्तान भारतातील त्यांच्या या दोन अधिकाऱ्यांच्या मार्फत सैन्यातील अधिकाऱ्यांना लक्ष्य बनवत होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा