मुंबई, दि. १५ जून २०२०: बॉलिवूड सुपरस्टार सुशांतसिंग राजपूतने मुंबईतील आपल्या राहत्या घरामध्ये फाशी लावून आत्महत्या केली. तो ३४ वर्षांचा होता. त्याच्या निधनाच्या बातमीने चित्रपट जगतात शोककळा पसरली आहे. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की सुशांत सिंग ने असे का केले? सुशांत सिंगने आपल्या आयुष्यामध्ये खूप सार्या वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्याच्या आकांक्षा ठेवल्या होत्या. आयुष्याकडे एवढ्या सकारात्मकतेने बघणारा सुशांत सिंग असे काही करेल याची कुणी कल्पना देखील केली नव्हती.
सुशांतसिंग राजपूत याची स्वप्ने देखील अशी होती ज्यांचे पूर्ण होणे म्हणजे खूपच रंजक होते. त्याने चंद्रावर एक प्लॉट घेतला होता. बरेच लोक आश्चर्यचकित होऊ शकतात, परंतु हे सत्य आहे. सुशांतने २०१८ मध्ये चंद्रावर जमीन खरेदी केली होती. त्याची ही जमीन ‘सी ऑफ मसकोवी’ मध्ये आहे. सुशांतने चंद्रावर ही जमीन इंटरनेैशनल लूनर लँड्स रेजिस्ट्रीमधून खरेदी केली होती. या भूखंडावर नजर ठेवण्यासाठी सुशांत सिंगने एक खास प्रकारची दुर्बिणीदेखील विकत घेतली होती. त्याच्याकडे अॅडव्हान्स टेलीस्कोप १४ एलएक्स १०० (14LX00) होता.
तथापि, आंतरराष्ट्रीय संघटनांचे असे म्हणणे आहे की, ही जमीन कायदेशीररित्या कोणाच्याही मालकीची मानली जाऊ शकत नाही, कारण पृथ्वीच्या बाहेरील जग हा संपूर्ण मानव जातीचा वारसा आहे आणि कोणत्याही एका देशाचा ताबा अशा गोष्टींवर नाही. परंतू हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सुशांत चंद्रावर जमीन खरेदी करणारा पहिला अभिनेता होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी