मुंबई, दि. १५ जून २०२०: पाटणा पासून सुरु झालेला सुशांत सिंग राजपूतचा प्रवास आज मुंबईमधील पवनहंस स्मशानभूमीत संपला. चित्रपटसृष्टीत परिवार वाद आणि गटवाद याला आव्हान देत आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण केले होते. चित्रपटसृष्टीत कोणतेही बॅकग्राऊंड नसताना आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे कलाकार हे बोटावर मोजण्याइतकेच आहेत. त्यातीलच सुशांत सिंग राजपूत हा एक होता. सिनेसृष्टीतील भावी सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुशांत सिंगने काल गळफास घेऊन आपला प्रवास थांबवला.
अंतिम निरोप देण्यासाठी वडील, चुलत भाऊ, तीन बहिणी आणि इतर स्नेही उपस्थित होते. तसेच चित्रपटसृष्टीतील त्याचे सर्व सहकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी केवळ २० जणांना स्मशानभूमी मध्ये सोडण्यात आले होते. सुशांत सिंगला अखेरचा निरोप देण्यासाठी त्याच्या फॅन्सनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
चित्रपट कारकीर्दीत चित्रपटांपूर्वी त्याने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सुशांतची पहिली मालिका ” किस देश में है मेरा दिल ” होती. पण त्याला पवित्र रिश्ता सिरियलमधून जास्त प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्याने काई पो चे, एमएस धोनी, केदारनाथ, छिछोरे यासारख्या हिट चित्रपटात काम केले आहे.
चित्रपटसृष्टी मध्ये त्यानी स्वतःचे स्थान निर्माण केले होते. चित्रपट सृष्टी मध्ये येण्यासाठी त्याच्याकडे कोणत्याही पारिवारिक पार्श्वभूमी नव्हती. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेला एक तरुण चित्रपटसृष्टीमध्ये येतो आणि आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करतो हे नक्कीच कौतुकास्पद आहे. चित्रपटसृष्टीत असे आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या व्यक्ती मोजक्याच आहेत. त्यापैकी इरफान खान ज्याचा नुकताच मृत्यू झाला. नवाजुद्दीन सिद्दिकी आणि स्वतः सुशांत सिंग राजपूत हा.
न्यूज अनकट प्रतिनिधी