पुरंदर, दि. १९ जून २०२०: माजी केंद्री माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार मागील आठवड्यात बारामती येथे मुक्कामी होते. आज गुरुवारी संध्याकाळी मुंबईकडे निघाले होते. प्रवासात रस्त्यावर त्यांनी अपघात झाल्याचा पाहिला. भले मोठे पोकलेन मोटारीवर पडल्याचे पाहून त्यांनी तातडीने आपली मोटार थांबवली व ते अपघातस्थळी भेट दिली.
पुरंदर तालुक्यातील मावडी क.प. येथे जेजुरी- मोरगाव रस्त्यावर झालेला अपघात पाहून ज्येष्ठ नेते व माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी तातडीने आपली मोटार थांबवत अपघातात कोणी जखमी तर झाले नाही ना, याची चौकशी केली. तसेच, संबंधित पोकलेन मालकाची आस्थेने विचारपूस करत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.जेजुरी- मोरगाव रस्त्यावर पुरंदर तालुक्यातील मावडी क.प. या गावच्या हद्दीमध्ये आज एक पोकलेन मशीन रस्त्याच्या बाजूला उभे होते व त्याच्याच बाजूला संबंधित मालकाची आलिशान मोटार उभी होती. मात्र, रस्ता खचल्याने पोकलेन मशीन उलटून गाडीवर पडल्याने अपघात झाला. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही, मात्र आलिशान गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, अशी माहिती जेजुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली.
या वेळी शरद पवार याच रस्त्याने जात होते. त्यांनी हा अपघात पाहिला. थेट जेसीबी मोटारीवर पडल्याचे पाहून त्यांनी तातडीने आपली मोटार थांबवली व ते अपघातस्थळी गेले. तेथे त्यांनी पाहणी केली व संबंधित पोकलेन मालक बप्पा रामचंद्र चाचर यांना बोलावून घेत अपघातामध्ये कोणी जखमी झाले आहे का, याबाबत आस्थेने विचारपूस केली. तसेच, गाडीच्या झालेल्या नुकसानीबाबत बारामती येथे शोरूममध्ये संपर्क करत तेथे गाडी घेऊन जाण्यास सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे