टाकळी येथे नेहरू युवा मंडळाच्या वतीने आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे मोफत वाटप

14

टाकळी (माढा), दि. १९ जून २०२०: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील नेहरू युवा मंडळ टाकळी (टे) व अश्विनी हॉस्पिटल टेभूर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने टाकळी (टे) ता. माढा येथे आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे मोफत वाटप ३००० नागरिकांना करण्यात आले. या वेळी डॉ मामासाहेब पाडुळे यांनी गोळ्यांचे महत्त्व पटवून कोरोणा आजाराविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित कोरबू मॅडम, मंडळ अधिकारी रंजनी, खुळे तलाठी भाऊसाहेब, वडोली उपसरपंच तानाजी गाडे पाटील, डाँ दगडू घाडगे, सर्व अंगणवाडी मॅडम व बचत गटाच्या मॅडम उपस्थित होत्या. प्रा. मुकुंद सोनवणे यांनी प्रस्ताविक केले. आभार मा. तानाजी सलगर यांनी मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील