अंदमान निकोबार: भारत आणि पाकिस्तान संबंध ताणले गेलेले असताना भारतीय हवाई दलाने ब्रह्मोस मिसाईलची यशस्वी चाचणी केली आहे. जमिनीवरून ३०० किमी अंतरावर ही मिसाईल मारा करू शकणार आहे.
भारतीय हवाई दलाने मागील दोन दिवस ब्रह्मोस मिसाईलची चाचणी घेतली. २१ आणि २२ ऑक्टोबरला ब्रह्मोस मिसाईलने ३०० किलोमिटर दूर असलेलं अंतर अचूक भेदलं.
जमिनीवरून जमिनीवर हल्ला करण्यासाठी या मिसाईलची ओळख आहे. त्यातच कमी जागेतून लाँच केल्यानंतरही या मिसाईलने दूर असलेलं अंतर अचूक टिपलं आहे. तज्ञांच्या माहितीनुसार, हवाई दलाने अंदमान निकोबार बेटावरील ट्राक बेटावर या दोन्ही मिसाईलची दोन दिवसांच्या आत चाचणी घेतली. या मिसाईलने आपली कामगिरी चोख बजावली आहे.
ब्रह्मोस मिसाईल ही मध्यम अंतरात एक अशी सुपरसॉनिक मिसाईल आहे, ज्यामुळे एखादा एअरक्राफ्ट, युद्धनौका कमी जागेतून अचूक भेदू शकते.
या चाचणीनंतर भारतीय हवाई दल आणखी सक्षम आणि सामर्थ्यवान झालं आहे.