आजचे राशिभविष्य

मेष : शुभ रंग : निळा | अंक : ५ आरोग्याच्या काही तक्रारी तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे आणतील. त्यामुळे क्षुल्लक तक्रारीही दुर्लक्षित करू नका. वैवाहीक जिवनांत थोडेसे मौन बरे राहील.

वृषभ : शुभ रंग : शुभ रंग : तांबडा | अंक : ३ अडकलेला पैसा येण्याची शक्यता आहे. आर्थिक ताण तणाव आता कमी होईल. आज घरगुती प्रश्नांत जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळू शकेल.

मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : ८ कार्यक्षेत्रात हितशत्रू दबा धरून बसलेले असताना एखादी क्षुल्लक चूकही परवडणारी नाही. कोणतेही निर्णय उतावीळपणे घेऊ नका. आरोग्यास जपा.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : २ काही रसिक मंडळी कामे बाजूला ठेवून मौजमजेस प्राधान्य देतील. सहकुटुंब पावसाळी सहलींचे आयोजन करतील. प्रेमप्रकरणे फुलतील, बहरतील.

सिंह : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ३ कौटुंबिक वाढत्या गरजा आर्थिक तराजू डळमळीत करतील. अनावश्यक खर्चात कपात अत्यंत गरजेची राहील. आईच्या तब्येतीची विचारपूस करणे गरजेचे

कन्या : शुभ रंग : सोनेरी | अंक : ४ काही अडचणीच्या प्रसंगी शेजारी मदतीस धाऊन येतील. अचानकपणे प्रवास घडण्याची शक्यता अाहे. आज घराबाहेर वाद होऊ शकतात. डोके शांत ठेवा.

तूळ : शुभ रंग : पिस्ता | अंक : १ आज तुम्हाला काही सज्जनांचा सहवास लाभेल. त्यांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. अती सडेतोड बोलल्याने आपलीच माणसे दुखावण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी | अंक : ८ आज तुम्ही स्वत:च्या प्रेमात रहाल. चैन करण्यासाठी पैसा खर्च कराल. मीच म्हणेन ती पूर्व असे तुमचे धोरण राहील. पूर्वीच्या गुंतवणूकीतून फायदा होईल.

धनू : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ६ व्यावसायिकांनी मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात. थोरांचे अनुभवाचे बोल ऐकून घ्यावेत. अती आक्रमकतेने निराशाच पदरी पडेल.

मकर : शुभ रंग : राखाडी| अंक : ७ आज मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रातील नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. वैवाहीक जिवन सौख्यपूर्ण राहील. आरोग्य उत्तम साथ देईल.

कुंभ : शुभ रंग : क्रिम | अंक : ९ आज तुम्ही फार हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. अधिकारांचा गैरवापर महागात पडू शकेल. सामंजस्याचे धोरण हिताचे.

मीन : शुभ रंग : अबोली | अंक : ५ नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवेल. वरीष्ठांच्या मागे पुढे करावेच लागणार आहे. कोणतेही कौटुंबिक निर्णय वडीलधाऱ्यांच्या संगनमताने घ्यावे लागतील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा