एका नसबंदीची दोनदा पगारवाढ

मध्यप्रदेशमधील विधानसभेच्या अधिकाऱ्यांचा प्रताप

मध्यप्रदेश : मध्यप्रदेशमध्ये मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. विधानसभेच्या सचिवांपासून अधिकाऱ्यांनी एकदाच नसबंदी करुन त्याची दोनदा पगार वाढ करुन घेतली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मध्यप्रदेशच्या विधानसभेतच मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे.नियमानुसार एकदा नसबंदी केली की पगार वाढ देण्यात येते.
मध्यप्रदेश राज्यात सध्या मोठे मोठे अधिकारी वेगवेगळ्या स्कँडल, तसेच लाज घेताना अशा विविध प्रकारात आढळत आहेत.त्यातच हे प्रकरण उघड झाल्यामुळे विधानसभेतील अधिकारीही महसूल विभागाला फसवत असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकारात विविध विभागातील ३५ जणांचा सहभाग आहे. याबाबत कर्मचाऱ्यांना संबंधीत प्रकरणात भरपाईच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
वेतन निश्चितीसाठी सर्व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक कोषागार विभागाला पाठवण्यात आले होते.त्यावेळी ही तफावत आढळून आली आहे. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांना जे जादा पैसे घेतले आहेत ते परत करावे लागणार आहेत. तसेच त्यांना पेशन्सलाही मुकावे लागणार आहे. त्यातच रक्कम वाढविण्यासाठी काही कर्मचाऱ्यांनी दोन वेळा नसबंदी केल्याची प्रमाणपत्रे जोडली आहेत. त्यामुळे वेतन आणि मंजूर असलेली रक्कम यात तफावत आढळून आली आहे.
त्यामुळे हा मोठा घोटाळा मध्यप्रदेश विधानसभा कर्मचाऱ्यांमधून उघडकीस आला आहे. या जादा रकमेची त्यांच्याकडून लवकरच वसुलीही करण्यात येणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा