देव तारी त्याला कोण मारी !

56

मध्यप्रदेश : बऱ्याचदा आपण नशिबाला दोष देतो. कारण ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला नको त्या गोष्टी घडतात. अशीच एक घटना भोपाळमध्ये घडली .त्या व्यक्तीचे नशीब जोरावर म्हणून की काय, अंगावरून तीन रेल्वे जाऊनही ती व्यक्ती जिंवत राहिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दारूच्या नशेत एक व्यक्ती रेल्वे रुळावर जाऊन झोपला होता. काही वेळातच या रुळावरून लागोपाट तीन रेल्वे गाड्या गेल्या.सर्वांना वाटले की ही व्यक्ती मेली की काय.परंतु काही वेळाने ही व्यक्ती पुन्हा उठून बसली. ही घटना मध्यप्रदेशमधील अशोकनगर या भागात घडली.
अशोकनगर रेल्वे स्टेशनपासून दीड ते दोन किमी अंतरावर रेल्वे ट्रकवर एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.तिसरी रेल्वे गेल्यानंतर पोलीस मृतदेह पाहण्यासाठी गेले असता ती व्यक्ती चक्क उठून बसली. त्यामुळे सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला.
धर्मेंद्र आदिवासी असे संबंधित व्यक्तीचे नाव असून दारु पिऊन आपण कधी येथे झोपले हे त्यालाही समजले नाही. अशी माहिती पोलिसांनी दिली.