नवी दिल्ली, २८ जून २०२० : कोविड १९ मुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्वयंसेवी संस्था समाजातील व्यक्तिगत दानवीर आपापल्यापरीने देशातील गोरगरिब व गरजू लोकांपर्यंत गरजेच्या वस्तू पोहचवत आहेत अशाच काही व्यक्तिंपैकी एक व्यक्ति म्हणजे प्रसिद्ध भारतीय शेफ विकास खन्ना.
४८ वर्षीय शेफ विकास खन्ना यांनी स्वत:च्या व्यवसायिक स्वयंपाक गृहातून या लॉकडाऊनच्या काळात देशभरातील, अनेक वृध्दाश्रम, अनाथाश्रम, कुष्ठरोग केंद्रांवर कोरडे राशन वितरित केले. त्यांच्या या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याच मोहिमेची देखल घेत BBC ने त्यांची मुलाखत घेतली. परंतू या मुलाखतीमध्ये टेलिविजन अँकरने शेफ विकास खन्ना यांना एक खोचक प्रश्न विचारला. तो म्हणाला, “तुम्ही ओबामांसाठी स्वयंपाक केला आहे, तुम्ही गॉर्डन रॅमसेबरोबर टीव्ही शोमध्ये आलात. परंतु हे नेहमीच तसे नव्हते, नाही का? तुम्ही श्रीमंत कुटुंबातील नाही त्यामुळे तुम्हाला भुकेची किंम्मत किती आहे हे समजू शकते , म्हणून मी विचारायची हिम्मत करतो की तुम्हाला हे माहित आहे की भारतात हे अन्नदान करणे किती अनिश्चित असू शकते,”
यावर शेफ विकास खन्ना यांनी न चिडता शांतपणे त्या अँकरला उत्तर दिले की, “मी अमृतसरचा आहे, तेथे सर्वजण लंगरमध्ये लोकांना खाऊ घालतात , त्यामुळे भुकबळीची भावना हि मला भारतातून नाही तर न्यूयॉर्क मधून आली.”
शेफ विकास खन्ना यांच्या BBC अँकरला दिलेल्या या सडेतोड उत्तराचे सर्व सोशल मिडियावर कौतुक होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी