सोलापूर, दि. २८ जून २०२० : सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी ते अकलूज या दोन शहरांना जोडण्यात येणारा रस्ता हा पालखी मार्ग आहे. टेंभुर्णी ते म्हसवड राज्यमार्ग क्रमांक ५४८ सी असून टेंभुर्णी ते अकलूज या शहरातून हा रस्ता जातो. या चार पदरी रस्त्याचे काम चालू असून मेघा इजिनिअरिंग कंपनीने हे काम घेतले आहे.रस्त्यावर शुक्रवारी व शनिवारी झालेल्या पावसाने अडीच फूट पाणी साचले होते.
कोणतेही वाहने या रस्त्याने जाऊ शकत नव्हती. ठेकेदाराने पावसाळ्यात अशा प्रकारचा हलगर्जीपणा दाखवल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता संगम येथील युवासेना तालुका प्रमुख गणेश इंगळे संगमकर पुढे येऊन सहकाऱ्यांना मदतीला बोलावून इंधनावर चालणाऱ्या दोन इंजिनच्या साह्याने रस्त्यात साचलेले अडीच फुट पाणी पाच तास दोन इंजिन चालवून रस्ता प्रवाशांना रिकामा करून दिला.
गणेश इंगळे म्हणाले की गेली अडीच वर्षे झाले या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असून अकलूज ते टेंभुर्णी २८ किलोमीटर अंतर असून या मेघा कंपनीने २८ किलोमीटर आंतर अडीच वर्षे वेळ लावला असून अजूनही काम अपूर्णच आहे. अशा निष्काळजी व बेजबाबदार ठेकेदारावर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी गणेश इंगळे यांनी केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील