भारताच्या अँप्सवरील बंदीच्या निर्णयानंतर चीन आर्थिक चिंतेत

बीजिंग, दि. ३० जून २०२०: लडाखमध्ये चीनबरोबर सुरू असलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवरही भारताने आर्थिक आघाडीवर चीनला वेढा घालण्यास सुरवात केली आहे. भारतीय कंपन्यांमधील परदेशी गुंतवणूकीचे नियम कठोर केल्यानंतर आता भारत सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव टिक टॉकसह ५९ चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. भारताच्या कठोर निर्णयांमुळे चीनच्या आर्थिक नुकसानीबाबत चिनी माध्यमांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

चीनी सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सचे संपादक हू शिजिन यांनी ट्विटरमध्ये ट्विट केले आहे की, “ ५९ चायनीज अॅपवर भारतात बंदी घातली गेली आहे, जर चीनी लोकांना भारतीय वस्तूंवर बहिष्कार घालवायचा असेल तर त्यांना जास्त भारतीय वस्तू मिळणार देखील नाहीत. ” यानंतर त्यांनी ‘भारतीय मित्रांना’ इशारा देण्याचा प्रयत्न केला की राष्ट्रवादापेक्षा इतर अधिक गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.

ग्लोबल टाईम्स या चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या वृत्तपत्रा मध्ये एक लेखही समोर आले आला आहे ज्यात भारतातील राष्ट्रवादाच्या उदयामुळे व्यवसायाचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. असे ग्लोबल टाईम्सने लिहिले, त्यांनी पुढे म्हंटले आहे की, “चीनविरूद्ध भारतातील वाढत्या राष्ट्रवादाची तीव्रता आता आर्थिक क्षेत्रात पोहचली आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या संकटामुळे आणि भारत आणि चीनमधील सुरू असलेल्या तणावामुळे दोन्ही देशांमधील व्यापार ३० टक्क्यांनी कमी झाला आहे.”

भारत आणि चीन यांच्यात जर कमी व्यापार झाला तर त्याचा चीनवर अधिक परिणाम होईल. कारण भारत चीनकडून वस्तूंची आयात जास्त करतो त्या बदल्यात भारताचे निर्यात खूप कमी आहे. ही तफावत पाहता याचे सर्वात जास्त नुकसान चीन ला सोसावे लागणार आहे. तर भारताला यासाठी खूप कमी नुकसान सहन करावे लागेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही चीनशी असलेली आपली व्यापार तूट असल्याचे नमूद करून म्हटले होते की, चीनबरोबरचे संबंध संपल्यास अमेरिकेला फायदा होईल. हेच कारण आहे ज्यामुळे चीन चिंतेत आहे. कारण भारत आणि अमेरिकेसारख्या दोन मोठ्या बाजारपेठा चीनला गमवाव्या लागणार आहेत आणि त्याचा मोठा आर्थिक तोटा देखील सहन करावा लागणार आहे.

काही दिवसांपूर्वी गुंतवणूकीवर भारत सरकारने लावलेले निर्बंध तसेच काल घेण्यात आलेला मोठा निर्णय यांचा अंदाज घेता चीनने आपल्या गुंतवणूकदारांना आणि उत्पादकांना स्पष्ट सांगितले आहे की, भारतातील वाढती राष्ट्रवादी भावना आणि गुंतवणुकीवरील निर्बंध पाहता सतर्कतेने गुंतवणूक व उत्पादन करावे.

चिनी वृत्तपत्राने बंदरांवर चिनी मालवाहतुकीच्या अतिरिक्त तपासणीचा उल्लेख केला आहे. या वर्तमानपत्राने लिहिले आहे की, “भारत आणि चीन यांच्यात नुकत्याच झालेल्या सीमा संघर्षानंतर भारतातील काही राजकारणी आणि माध्यम वाहिन्या भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करीत आहेत. भारतीयांमध्ये चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याशिवाय बंदरात चिनी मालवाहतूक बंद करावी असे देखील सांगितले जात आहे. सीमा संघर्ष होण्यापूर्वीच भारताने परदेशी गुंतवणूकीबाबतचे नियम कठोर केले होते जे चीनी कंपन्यांना भारतीय कंपन्यांचा ताबा घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे आणि राजकीय हितसंबंध साध्य करण्यासाठी हे पाऊल उचलले गेले. हे दर्शविते की भारतीय बाजारपेठ आणि भारताची आर्थिक रणनीती किती अपरिपक्व आहेत.

ग्लोबल टाईम्सने लिहिले आहे की, चीनला चीनमध्ये स्थापित कंपन्यांना पुन्हा स्थानांतरित करायचे आहे, परंतु हार्डवेअर व सॉफ्टवेअर क्षेत्रात पायाभूत सुविधा नसल्यामुळे हे फार कठीण आहे. चिनी वृत्तपत्राने लिहिले, “चीनशी आर्थिक संबंध संपवणे इतके सोपे नाही. दुसरीकडे भारतीय बाजारात शक्यता शोधणार्‍या कंपन्यांनी गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा वाढविण्यापूर्वी राष्ट्रवादाबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. इतर देशांमध्येही आपण आपल्या परकीय गुंतवणूकीबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे, विशेषत: जर ते भारताशी कायमस्वरूपी मैत्रीची हमी देऊ शकत नाहीत. ”

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा