तिरुवनंतपुरम, दि. १ जुलै २०२०: केरळच्या खासगी बससाठी किमान शुल्कात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता ५ किलोमीटरसाठी प्रवासासाठी प्रवाशांना १० रुपये व ७.५ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी १३ रुपये द्यावे लागतील. यापूर्वी ५ किलोमीटरसाठी ८ रुपये आकारले जात होते परंतू सुधारित धोरणामुळे बस चालकांना अडीच किलोमीटरसाठी ८ रुपये शुल्क आकारता येणार आहे. तथापि, हे वाढीव शुल्क केवळ अडीच किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणार्यांनाच लागू होईल.
परिवहन शुल्क मंत्रालयाने किमान शुल्क म्हणून दहा रुपये प्रस्तावित केले होते, परंतु केरळ मंत्रिमंडळाने बुधवारी नव्या सुधारित शुल्काबाबत निर्णय घेतला.
गुरुवारपासून नवीन शुल्क लागू होईल. खाजगी बस ऑपरेटर संघटनेने किमान शुल्क वाढवून दहा रुपये करण्याची मागणी केली होती. लॉकडाऊन मध्ये आता काही सवलती देण्यात आल्या आहेत त्यामुळे बसला पुन्हा एकदा चालण्यास परवानगी देण्यात आली. परंतु, कोविड -१९ सर्व देशभर पसरला आहे. या काळात सर्व बस सेवा बंद होत्या त्यामुळे मोठे नुकसान झाले कमी उत्पन्न झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आले असल्याचे सांगितले.
अलिकडच्या काळात केरळमध्ये निदर्शने झाली. राज्यातील काही भागांत, विशेषत: ग्रामीण भागात, प्रवाशांची संख्या कमी असल्याने बसेस धावणे थांबले आहेत. शुल्क वाढविण्यात आले नाही तर ते एका वर्षासाठी कामकाज थांबवतील असा इशारा संघटनांनी यापूर्वी दिला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी