पुणे, दि. १ जुलै २०२०: कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने कोरोना व्हायरसच्या संकटावर मात करण्यासाठी सुरुवातीपासून जनजागृतीपर अभिनव कार्यक्रम राबविण्यात आले होते. आतापर्यंत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी मनापासून प्रयत्न करत आहेत. या प्रशासनाच्या परिश्रमास नागरिकांची साथ मिळाली पाहिजे अशी अपेक्षा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.
तरी पण कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे याची खबरदारी घेऊन येथून पुढे मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे असे वरिष्ठ आरोग्य निरिक्षक मा. राम सोनवणे यांनी सांगितले. सदर दंडात्मक कारवाईची मोहीम महापालिका सहाय्यक आयुक्त मा. संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरिक्षक मा. राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सर्व आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, संतोष ताटकर, वैभव घटकांबळे, गणेश साठे, शिवाजी गायकवाड, गणेश साठे, सतीश बनसोडे, प्रमोद चव्हाण यांच्या निरीक्षणाखाली मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, अशोक खुडे, साईनाथ तेलंगी यांनी पुढाकार घेऊन प्रभाग क्रमांक १०,११,१२ या तीनही प्रभागात मास्क न वापरणाऱ्या एकूण ३५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून १७५००/- रूपये वसूल करण्यात आले.
सदर कारवाई डहाणूकर काॅलनी व कोथरूड गावठाण, मयूर काॅलनी, आयडियल काॅलनी, भुसारी काॅलनी, शिक्षक नगर, कुमार परिसर, शास्त्री नगर परिसरात कारवाई करण्यात आली. तसेच नागरिकांना मेगा स्पिकर घेऊन प्रबोधन व दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. सदर कारवाईत मुकादम वैजीनाथ गायकवाड यांनी नागरिकांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरीतून प्रबोधन करण्यात आले.
अनेक प्रकारचे व्यसन केल्यानंतर व सार्वजनिक ठिकाणी थुंकून अस्वच्छता केल्यानंतर मानवाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. संपूर्ण जगभर कोरोनाने थैमान घातले आहे मोहिमेमध्ये वैयक्तिक स्वच्छतेचे व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी थुंकून अस्वच्छता करू नका कोरोनाला व अनेक रोगाना आमंत्रण देऊ नका, पान तंबाखू खाऊ नका आपले आरोग्य धोक्यात आणू नका, विडी सिगारेट ओढू नका आपले फुफ्फूसे वाचवा, गर्दी टाळा कोरोना संसर्ग रोखा, एकमेकांत तीन ते चार फुटाचे अंतर ठेवा, वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवा, मास्क वापरा, हाताला व तोंडाला तसेच डोळ्याला स्पर्श करू नका, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेला महत्व द्या, कचऱ्याचे वर्गीकरण करा, नदी नाल्यात कचरा टाकू नका, प्लॅस्टिक मुक्त पुणे शहर करा अशाप्रकारे आवाहन करण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे