रायपूर – छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात एकूण १८ नक्षलवाद्यांनी पैकी चार नक्षलवाद्यांनी बुधवारी आत्मसमर्पण केले. या चार नक्षलवाद्यांना पकडून देण्यासाठी त्यांच्या नावे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दंतेवाडा जिल्हाधिकारी दिपक सोनी, पोलिस अधीक्षक अभिषेक पल्लव आणि भानसी पोलिस ठाण्याचे सीआरपीएफ अधिकाऱ्यांसमोर एका महिलेसह इतर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यावेळी नक्षलवाद्यांनी असे मान्य केले की इथून पुढे ते एक सामान्य आयुष्य जगतील आणि आपल्या भागाची प्रगती कशी होईल यासाठी सहकार्य करतील.
पल्लव म्हणाले की, हे सर्व जण माओवाद्यांच्या भैरमगड एरिया कमिटी अंतर्गत भानसी-कमलूर भागात सक्रिय होते आणि मुख्यत्वे रेल्वेमार्गाला नुकसान पोहचविण्याचे, माओवादी बॅनर, पोस्टर्स लावणे आणि नक्षलवादी प्रचार प्रसार करणे यांसारखी कामे करत होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी