मोकाट प्राण्यांची टोळी नागरिकांच्या घरी….

थेऊर, ७ जुलै २०२० : आपल्या देशाला संस्कृतीचा फार मोठा पगडा आहे.आणि त्यात जर पाळीव प्राण्यांचा प्रश्न आला तर मग आपल्याकडे त्यांना एक वेगळच स्थान दिले जाते.त्यांच्यावर प्रेम,दया याची शिकवण आपल्या संस्कृती मधे आहे. पण हे एका ठराविक मर्यादेपर्यंत मर्यादित राहिले तर बरे वाटते नाहीतर नाहक त्रास सहन करावा लागतो.

असाच प्रकार घडत आहे थेऊर मधील नागरिकां बरोबर जिथे पाळीव प्राणी मोठ्या प्रमाणात मोकाट फिरत आहेत तर अनेक घरांच्या आवारामध्ये ते घाण व दुर्गंधी पसरवत आहेत.थेऊर गावत प्राणी हे मोकाट आहेत तर काही जणांनी त्यात आपले प्राणी सोडल्यामुळे देखील मोकाट प्राण्याच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

या प्राण्यांचा घोळका हा घरातील आवरामध्येच नाही तर कधी कधी काही गोठ्यांमधे आपला मोर्चा वळवतात आणि तिथे तळ ठोकून रात्र काढतात.ज्यामुळे तेथील नागरिकांना स्वत:ची रात्र जागी राहूनच काढावी लागत आहे.तसेच नागरिकांनी ग्रामपंचायती कडे याबद्दल शिफारस केली आसता तेथील कार्यवाही देखील निराशाजनकच आहे.हि समस्या गतवर्षी देखील या ग्रामस्थांना झाली होती.त्या वेळी या मोकाट प्राण्यांचे स्थलातंर हे पांजरपोळ येथे करण्याचा निर्णय ग्रामसभेतील चर्चेत घेण्यात आला पण पुढे काही कार्यवाही झालीच नाही.

या सर्व परिस्थिती मुळे नागरिक हे हवालदिल तर झालेच आहेत पण त्या बरोबरच तेथील शासकीय प्रशासन देखील दुर्लक्षित करत असल्याचे चित्र समोर येत आहे.ज्यामुळे तेथील ग्रामवासीयांना मोकाट प्राण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा