उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यातील चौबेपुर या पोलिस ठाणे अंतर्गत झालेल्या चकमकीत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह ६-७ पोलिसांचा बळी गेला. या घटनेमुळे पोलिस यंत्रणेसह सर्व देश हादरून गेला आहे,बिकारु गावातील नामचीन गुंड विकास दुबे व त्याच्या साथीदारांच्यासह झालेल्या चकमकीत या सर्व पोलिसांचा बाली गेला. विकास दुबेची ची सुरुवात ही जमिनीच्या खरेदी विक्री व्यवसायातून झाली, जमिनीच्या व्यवहारात स्थानिक नागरिकांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन करोडो रुपयांची माया जमा केली व गुन्हेगारीच्या क्षेत्रात पाय रोवले त्याचबरोबर स्थानिक राजकारणातही तो वरचढ होता. मोठ्या राजकीय पक्षाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले होते ते इतके घट्ट आहेत की गेली 20 वर्ष गावचा सरपंच हा दुबे घरातीलच आहे. त्याचबरोबर स्वतः पंचायत सदस्य होता व त्याची पत्नी साध्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहे.
विकास दुबेच्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये दुबे यांनी माझे राजकीय गुरू हे उत्तर प्रदेशचे विद्यमान सभेचे माजी अध्यक्ष हरिशंकर श्रीवास्तव हे असून त्यांनीच मला राजकारणात पुढे आणले असे म्हटले आहे. श्रीवास्तव हे १९९० ते ९१ मध्ये मुलायमसिंह यादव यांच्या सरकारमध्ये सभागृहाचे अध्यक्ष होते. जर विधानसभेचे अध्यक्ष राजकारण्यांचा विकास करत असतील तर पुढे कोणी बोलू शकत नाही? राजकारणी व गुन्हेगार यांच्यातील संबंधावर न बोललेलेच बरे! हा व्हिडिओच सर्वच काही बोलून जातो. विकास दुबेवार ६० पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, त्याचबरोबर पोलीस यंत्रणेने बरोबर सलोख्याचे संबंधांचा च पडदा उघडला आहे. कारण ज्या दिवशी बिकारु गावात पोलीस संपूर्ण तयारीनिशी विकास दुबईला अटक करण्यासाठी जात होते त्याच वेळी चुंबेपूर पोलिस ठाण्यातून पोलिसांच्या हालचालीची इत्यंभूत माहिती पुरवण्यात आली होती, या माहितीमुळे दुबे यांनी आपल्या साथीदारांना शास्त्र सह घरी बोलवले होते. त्यावेळी गावात पोलीस पोहोचले त्यावेळी गावातील वीज पूर्णपणे बंद करून पोलिसांच्या वर हल्ला करण्यात आला, या हल्ल्यात दुबे यांची पत्नी व मुलगी पळून जाण्यात यशस्वी झाले पण आठ पोलिसांचा बळी गेला.
आता या घटनेला जबाबदार कोण ? पोलीस, विकास दुबे की राजकारणी? सद्यस्थितीत आरोपीच्या पिंजर्यात पोलिस उभे आहेत वरिष्ठ पोलिस अधिकारी दिनेश कुमार पी. यांनी ठाणे प्रभारी विनय कुमार तिवारी चौबेपुर पोलीस ठाण्यातील दोन पोलिस उपनिरीक्षक कुवारपाल कृष्ण कुमार शर्मा व कॉन्स्टेबल राजू यांना निलंबित केले आहे व चौबेपुर,शिवली, शिवराजपुर, बिल्लोर पोलीस ठाण्यातील ९० कर्मचाऱ्यांचे फोन जप्त केले आहेत व चौकशी चालू केले आहे. पण घटना घडून गेली आहे आहे याचाच अर्थ तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा हा एक प्रकार आहे. आज पर्यंत विकास दुबे हा सर्व गुन्ह्यातून सहीसलामत सुटत आला आहे कारण विकास दुबेची इतकी दहशत आहे की पोलिस सुद्धा साक्ष देण्यास कोर्टात उभे राहत नाही, तिथे सर्वसामान्य साक्षीदाराची काय हिम्मत हीच गोष्ट दुबेच्या पथ्यावर पडते.
योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारीला चाप लावण्याची मोहीम हाती घेतली. त्यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात जवळपास ११३ पेक्षा जास्त गुंडांचे एन्काऊंटर केले गेले. व त्या यशाची धनी योगी झाले. तसेच घडलेल्या घटनेची ही जबाबदारी ही योगीचीच आहे. पण ह्या गुन्हेगाराचे नंबर मध्ये दुबे चे नाव नव्हते ६० पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यातील आरोपीची योगी सरकारकडे यदाकदाचित माहितीही ननसावी? पोलिसांची हत्या झाल्यानंतर दुबेचे घर हे अनधिकृत होते हे कळाले व लगेच बुलडोजरने ते जमीनदोस्त केले. तोपर्यंत घरचा अनाधिकृत पणाचा शोध लागला नव्हता, ही आश्चर्याची गोष्ट आहे. योगी आता विकासांचा काय निर्णय घेणार यांच्यावरती देशातील पोलिसांच्या मनोधैर्यावरती परिणाम होणार आहे. आता जरी राजकारणी व गुन्हेगार संबंधांचा विचार करून अतिशय कडक निर्णय घेण्याची वेळ आहे.
उत्तर प्रदेश मध्ये हे काही पहिल्यांदा घडलेली घटना नाही कारण चाळीस वर्षांपूर्वी छबिराम टोळीने केलेल्या हल्ल्यामध्ये अलीगंज पोलीस ठाण्याचे 11 पोलिस चकमकीत मारले होते व ते एकाच पोलीस ठाण्याचे होते. आता योगी च्या हाती सत्ता आहे या राज्याने देशाला सर्वात जास्त पंतप्रधान दिले त्याच राज्यातील गुन्हेगाराचा आलेख कुठेतरी थांबावा कारण उत्तर प्रदेशचा विकास करण्यासाठी असे खूप विकास उत्तर प्रदेश मध्ये आहेत.
अशोक कांबळे