मुद्दाम नाकाची आणि घश्याची छेद आक्रुती संदर्भासाठी दिली आहे. कोव्हिड१९ चे विषाणू नाकाच्या अंतस्त्वचे वर चिकटून त्या त्वचेच्या पेशीमधे प्रवेश करतात. नाकाच्या मागचा घश्याचा भाग (nesopharynx) ही त्वचेच्या पेशी नाकातल्याप्रमाणेच असतात. तेथेही या विषाणूचा प्रादुर्भाव होतो. तेथे प्यायलेल पाणी जात नाही, त्याचा परिणाम शक्य नाही. वाफ नाक घसा सर्वत्र पोहोचते. पुरेसा वेळ वाफ घेतल्यास तेथील तापमान ४५℃ इतके थोडा वेळ राहिले तर हे विषाणू निष्क्रिय होतात.
नाक शिंकरल्यास नाकातील वरवरच्या बाधित पेशी सुद्धा बाहेर निघून जातात छातीत होणारे संक्रमण टळू शकते. हा विषाणू अगदी निशक्त आहे. तो जेव्हा नाकात असतो त्यावेळी कणकण सर्दी इतपतच त्रास असतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होते व तो फुप्फुसात संक्रमित होतो. मगमात्र धाप सुरु होते, खोकला वाढतो. फुप्फुसाचा किती भाग व्यापला त्याप्रमाणात धाप कमी अधिक होते व धोका वाढतो. रुग्णालयीन उपचाराची आवश्यकता वाढते.
मला वाटत समाजात वावरणाऱ्या लोकांनी घरी आल्यावर वाफ घेणं नंतर गरम पाण्यात थोडे मीठ टाकून गुळण्या करणं हा प्रथमोपचार पुरेसा आहे. बाधित व्यक्ती पासून नाकापर्यंतचा प्रसार आपण त्या जवळ ५ फुटाचे आत असल्यास हवेतून होउ शकतो, किंवा हाताने होतो. म्हणून दोन व्यक्तीमधलं अंतर सांभाळण आणि वरचे वर हात धुणे.
हायपोफँरिंक्स पर्यंत विषाणू न जाउ देणच महत्वाचे.
डॉ. वसंत करमरकर, मिरज.