मुंबई, दि. ११ जुलै २०२०: स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. जोशुआ हिने एका स्टँड अप कॉमेडी शो दरम्यान शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याची चर्चा होत आहे. या स्टँड अप कॉमेडी शो मध्ये तिने अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचा प्रस्तापित पुतळ्या विषयी वादग्रस्त विधान केले आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामुळे शिवप्रेमी संतापले असून सर्वत्र या व्हिडीओ विषयी संताप व्यक्त केला जात आहे.
या स्टँड अप कॉमेडी शो मध्ये अग्रिमा जोशुआ हीने महाराजांवरून वादग्रस्त वक्तव्य तर केलेच परंतु त्याबरोबरच महाराजांचा एकेरी उल्लेख देखील केला. महाराजांवरून तिने विनोद निर्माण करण्याचा प्रयत्न केला याविषयी तिने सांगताना म्हटले की, “मुंबईमध्ये बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल मला जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी इंटरनेटवरील सर्वात विश्वासार्ह साईटवर गेले आणि ती म्हणजे क्वोरा” क्वोरा साईट वरती तिने काय काय बघितले व काय वाचण्यास मिळाले याविषयी तिने आपला अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला मात्र हा अनुभव विनोदी मार्गाने तिने सांगितला. “मला तिथे एकाने लिहिलेला भलामोठ्या आकाराचा निबंध सापडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी शिवाजी पुतळा मास्ट्ररस्ट्रोक आहे. यामुळं महाराष्ट्राचं भलं होईल असं या निबंधामध्ये लिहिलं होतं. तर दुसऱ्या एकाला वाटलं की इथ क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट सुरु आहे. म्हणून त्याने तिथे, या स्मारकात जीपीएस ट्रॅकरसुद्धा असणार स्मारकाच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जिच्या माध्यमातून अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्म केला जाईल. तर एकाने तिथे येऊन तुमची माहिती नीट करुन घ्या आणि शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, असं लिहिलं होतं… मी याच शेवटच्या व्यक्तीला फॉलो केलं,” असं अग्रिमा म्हणाली.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक ठिकाणी प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली या दरम्यान शिवसेनेचे नेते आमदार प्रताप नाईक यांनी देखील या व्हिडिओवर संताप व्यक्त करत कारवाई केली जावी अशी मागणी असणारे पत्र राज्याच्या गृहमंत्र्यांना दिले आहे. शिवभक्तांना कडून देखील तिच्यावर कारवाई केली जाण्याबाबत मागण्या केल्या जात आहे.
या व्हिडिओचा आणि शेत करत सरनाईक यांनी एक व्हिडीओ देखील बनवला आहे व तो सोशल मीडियावर टाकला आहे. हे व्हिडिओमध्ये ते म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या मुजोर कॉमेडियन अग्रीमा जोशुआला ताबडतोब अटक करण्यासंदर्भात मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे. आपण या विषयांची अत्यंत गंभीर दखल घेऊन असल्या विकृत कॉमेडियन ला अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे.”
न्यूज अनकट प्रतिनिधी