फुले आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी बीआरएसपी मैदानात – ॲड. सुरेश माने

नागपूर, १३ एप्रिल २०२४ : निवडणूका या केवळ सत्ता काबीज करण्यासाठीच असतात असे नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे सत्ता हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. पण मनुवादी राजकीय पक्षांनी आतापर्यंत बहुजन समाजाच्या मतांवर सत्ता संपादन करून त्यांचे शोषण केले आणि सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विषमता कायम ठेवली. म्हणून या विषमतेच्या विरोधात फुले-आंबेडकरी चळवळ गतीमान करण्याची गरज आहे. भाजपा आणि काँग्रेस फुले-आंबेडकरी चळवळ वाढू देत नाही. ती वाढवण्यासाठी बीआरएसपी निवडणुकीच्या मैदानात उतरली असल्याचे प्रतिपादन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अँड. डॉ. सुरेश माने यांनी केले आहे.

डॉ. सुरेश माने नागपूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवार विशेष फुटाणे आणि रामटेक क्षेत्रातील बीआरएसपीचे उमेदवार ऍड. भीमराव शेंडे यांच्या प्रचारार्थ कमाल चौक येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते. याप्रसंगी दोन्ही उमेदवारांनी आपली भुमिका मतदारांसमोर मांडून त्यांना मतदानासाठी आवाहन केले. याप्रसंगी राष्ट्रीय उपाध्क्ष रमेश पाटील, पंजाबराव मेश्राम, सी. टी. बोरकर यांचीही भाषणे झाली. प्रा. मंगला पाटील यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर डॉ. विनोद रंगारी यांनी आभार व्यक्त केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा