महायुतीच्या प्रचारार्थ यवतमाळमध्ये सिनेअभिनेता गोविंदा यांचा रोड शो !

यवतमाळ, १३ एप्रिल २०२४ : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात प्रचाराच्या रणधूमामाळीला सुरवात झाली असून उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आज सिनेअभिनेता गोविंदा यांचा रोड शो आयोजीत करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने सध्या वेग पकडला आहे. अशातच आज सिने अभिनेता गोविंदा यवतमाळ येथे येत आहेत. चाहत्यांचे लाडके राजाबाबु आज यवतमाळ शहरातील अवधुत व्यायम शाळेपासुन रोड शो सुरू करतील. त्यानंतर दवा बाजार, माईंदे चौक, वीर वामनराव चौक, दाते कॉलेज चौक, आर्णी नाका, बस स्थानक चौक, शहर पोलीस स्टेशन ते पाच कंदील चौक, हनुमान आखाडा चौक, अप्सरा चौक, गांधी चौक, तहसील चौक, दत्त चौक आदी परीसरातुन परत अवधुत व्यायामशाळा येथे समारोप करणार आहेत.

यावेळी आ. मदनजी येरावार, हरीहर लिंगनवार, श्रीधर मोहोड, नितिन भुतडा, महादेव सुपारे, क्रांतीताई धोटे, तारीक लोखंडवाला, वसंत घुईखेडकर, देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, बिपिन चौधरी, सुरज ठाकुर, महेंद्र मानकर, सुरज गुप्ता, विशाल गणात्रा, रोहीत राठोड, आकाश धुरट, महेश पवार, सुमित खांदवे, गोविंदा फॅन क्लब, महाविद्यालयीन युवक आणि युवती प्रामुख्याने सामिल होणार आहेत. विषेश उल्लेखनिय बाब म्हणजे यावेळी सिने अभिनेता गोविंदा आपल्या चाहत्यांसोबत सेल्फी देखील काढणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सचिन झिटे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा