हार्दिक पटेल गुजरात कॉंग्रेसचा नवा चेहरा…

नवी दिल्ली, दि. १२ जुलै २०२०: हार्दिक पटेल हे आजच्या तरुण वर्गाचे नेतृत्व करत होते तर ते आधी कुठल्याही पक्षाच्या चेहरा नव्हते मात्र त्यांचा कल हा आधी पासून काँग्रेस कडे होता आणि या गोष्टीचा विरोध, समर्थन आणि कडे प्रश्न त्यांना करत होते. तर आता हार्दिक पटेल ची राज्य काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाली त्या मुळे आता विरोधकांच्या सर्व प्रश्नानां उत्तरे मिळाले आसून ते आता काँग्रेसचा चेहरा बनले आहेत.

कॉंग्रेसने गुजरातमधील पाटीदार आरक्षण चळवळीचे युवा नेते हार्दिक पटेल यांची राज्य कॉंग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. शनिवारी पक्षाचे संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हार्दिक पटेल यांच्या नियुक्तीस तातडीने परिणाम मंजूर केला. पटेल काही वर्षांपूर्वी गुजरातमधील पाटीदार आरक्षण आंदोलनाचा चेहरा म्हणून उदयास आले आणि नंतर ते कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. कॉंग्रेसने महेंद्रसिंग परमार, आनंद चौधरी यांना सूरत आणि यासिन गज्जन यांना देवभूमी द्वारकाच्या जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.

महत्त्वाचे म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हार्दिक पटेल कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. त्यानंतर राहुल गांधींनी मार्च २०१९ मध्ये झालेल्या मोर्चाच्या वेळी पटेल यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी हार्दिक म्हणाले होते की लोक मला विचारतात की मी कॉंग्रेस आणि राहुल गांधी का निवडले. तर आज मी सांगतो की राहुल गांधी प्रामाणिक आहेत, हुकूमशहासारखे वागण्यावर त्यांचा विश्वास नाही. म्हणूनच मी कॉंग्रेसची निवड केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा